August 19, 2022

असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल

Read Time:4 Minute, 0 Second

कोलकाता : येत्या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ घोंघावू शकते अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्याचा अंदाज असून चक्रीवादळ नंतर बांगलादेश आणि लगतच्या उत्तर म्यानमारकडे सरकणार असल्याचीही माहितीही हवामान खात्याने दिली होती. दरम्यान, आता हे असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले असल्याने येथील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

असानी चक्रीवादळ, पोर्ट ब्लेअर (अंदमान द्वीपसमूह) च्या पश्चिमेला सुमारे ३८० किलोमीटरने वायव्येकडे सरकणार असल्याने पुढील २४ तासांत ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. काल बंगालच्या खाडीमधील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले होते. हे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. दरम्यान, गेल्या मंगळवारी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून शनिवारपर्यंत ते पूर्व-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर हे वादळ अंदमान आणि निकोबार बेटांकडे जाईल असे आयएमडीने नमूद केले होते.

उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
यानुसार आज हे वादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहेत. सध्या तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळात बदलण्याची दाट शक्यता असून हे वादळ उत्तर आणि ईशान्येकडे सरकणार आहे. या चक्री वादळाला श्रीलंकेने असनी असे नाव दिले आहे. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशांना प्रभाव दाखवल्यानंतर हे चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले आहे. हवामान खात्यानुसार, यामुळे आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे.

समुद्रात प्रवास न करण्याचा सल्ला
या प्रदेशातील प्रशासनाने बंगालचा दक्षिणेकडील भाग आणि अंदमान समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. या कालावधीदरम्यान अंदमान समुद्रातून अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. या वादामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून वा-याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर असू शकतो. या चक्रीवादळाचे वादळात रुपांतर झाल्यास ते किती धोकादायक ठरू शकते हे हवामान खात्याने स्पष्ट केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + 15 =

Close