अष्टविनायकनगर भागात गोळीबार करुन 40 हजारांची लूट


गोळीबाराला न भिणारा बहाद्दर जेष्ठ नागरिक दरोडेखोरांना केला विरोध चाळीस हजार रुपये रोख रकमेची सूर्यप्रकाशात लूट

नांदेड,(प्रतिनिधी)-अष्टविनायक नगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या चोरट्यांना त्यांनी विरोध केल्यानंतर चोरट्यांनी तीन गोळ्या झाडून 40 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे.मोठा पोलीस फाटा पोहोचला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

अष्टविनायक नगर भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक रवींद्र जोशी वय 68 वर्ष हे सायंकाळी चार वाजता बँकेतून 40 हजार रुपये घेऊन आपल्या घरी आले, असताना ते गेटमध्ये आत गेल्यावर दुचाकी वर आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जोशी यांनी एका दरोडेखोराला पकडून खाली पाडले.पण आपला विरोध होताना पाहून दरोडेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याची माहिती सांगण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा कैद झाली आहे. मोठा पोलीस फौज फाटा अष्टविनायक नगर मध्ये पोहोचला असून विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अंदाज असा व्यक्त होत आहे की रवींद्र जोशी यांनी बँकेतून पैसे काढण्याचे दरोडेखोरांनी पाहिले आणि त्यांचा पाठलाग करत ते त्यांच्या घरापर्यंत आले वय जास्त असलेला माणूस आहे आपण त्याला ताब्यात घेऊन लूट करू हा दरोडेखोरांचा भाव रवींद्र जोशींनी धुळीस मिळवताना एका दरोडेखोराला खाली पाडले. बहाद्दर अशा या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांशी दिलेली झुंज इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असावी.


Post Views: 48


Share this article:
Previous Post: अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतुक करणाऱ्या हायवा गाडीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

May 7, 2024 - In Uncategorized

Next Post: गोळीबाराचे उत्तर गोळीबाराने; रविंद्र जोशींना लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेने पाच तासात पकडले

May 8, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.