August 19, 2022

अशोक चिकटे यांचे पीएचडी परीक्षेत यश!

Read Time:2 Minute, 15 Second

नांदेड दि. १६ – धम्मगीरी नगर तरोडा (बु.) येथील अशोक भिमराव चिकटे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएचडी परीक्षेत यश मिळवत डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.

सन २०२२ या वर्षात अशोक चिकटे यांनी इंग्रजी विषयात अमेरिकन निग्रो समाजाच्या गुलामगिरी लढची प्रेरणा   Theramatic Dimensions in Booker T.Washingtons Up from slavery and Barach ObamasDream from A Comparative Study. या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. हा प्रबंध प्रा.डाॅ.डि.एन.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात सादर केला. अशोक चिकटे यांनी हे यश सातत्यपूर्ण व चिकित्सक अभ्यास यातून मिळविले आहे.

अशोक चिकटे यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल धम्मगिरी नगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी अशोक चिकटे यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शकां सह त्यांचे वडील नांदेड जिल्हा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ बी. आर. चिकटे यांना देत संबंधित विषयाचा चिकित्सक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास सहज यश प्राप्त होते असे मनोगत व्यक्त केले.

भारतीय बौद्ध महासभेच्या वार्ड शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह  दामोदर सरकटे, गायकवाड, ईश्वर जोंधळे पावणे विशेषत्वाने अभिनंदन हार्दिक शुभेच्छा दिल्या अशोक चिट्टे यांचे डॉक्टरेट मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten + nineteen =

Close