अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या इसमास सक्तमजुरी!

Read Time:2 Minute, 30 Second

नांदेड दि.२ – निरागस बालिकेवर अत्याचार करणार्‍या एका इसमास न्यायालयाने दंडा सहित सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

नांदेड ग्रामीण पोस्टेच्या हद्दीत राहाणाऱ्या एका कुटूंबातील पावणे चार वर्षांच्या अल्पवयी निरागस बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी दोषी ठरवुन  न्यायालयाने अडीच वर्षे सक्त मजुरी व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सदर मुलीला निट बोलता येत नाही. ही बालीका घराशेजारी राहणाऱ्या लांडगे कुटूंबाच्या घरी नेहमी ये जा करीत असे.  ३ सप्टेंबर, २०१९ रोजी ही बालीका शेजारी राहणाऱ्या सुरेश विठ्ठल लांडगे, वय ६६वर्षै याच्या घरी गेली. सुरेशने तीला घरात घेवुन दार लावले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पाहिला आणि बालिकेच्या आईला सांगीतला. पीडितेची आई सुरेशच्या घरी गेली असता तेथे बालिके सोबत सुरेशने शारिरीक अत्याचार केल्याचे दिसुन आले.

या प्रकरणी पीडितीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सुरेश लांडगेविरुध्द गुरन ४३२ / २०१९ दालख केला. या प्रकरणाचा तपास मउपनि श्रीमती एस. ए. कदम व नंतर सपोनि विश्वजीत कासले यांनी केला. तपास अधिकाऱ्यांनी आरोपीता विरुध्द दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात विशेष न्यायालयाने सात साक्षीदार तपासुन न्या. रवींद्र पांडे यांनी आरोपी सुरेशला अडीच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्ष दि. १ फेब्रुवारी रोजी सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजु अॅड. एम. ए. बत्तुला यांनी मांडली. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × one =