अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा 25 वर्षीय युवक लिंबगाव पोलीसांनी 2 तासात गजाआड केला


नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून गुन्हा केलेल्या आरोपीला लिंबगाव पोलीसांनी अंधारात त्याचा पाठलाग करून दोन तासात गाजआड केले आहे.
दि.20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून एक 25 वर्षीय व्यक्ती अंधाराचा फायदा घेवून फरार होत असतांना लिंबगाव पोलीसांनी त्याचा अंधारात पाठलाग करून त्याला गजाआड केले आहे. या संदर्भाने लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 63/2024 दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलमासह पोक्सो कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन आदींनी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एम.दळवे, पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर, पोलीस अंमलदार एस.बी.सुर्यवंशी, काझी, पेद्देवाड यांनी पळून जाणाऱ्या शंकर गौतम गच्चे (25) यास पकडल्याबद्दल कौतुक कले आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत झाली आहे.


Post Views: 195


Share this article:
Previous Post: निवृत्ती वेतन धारकांनो सावधान ; तुम्हाला फसविण्यासाठी नवीन ऑनलाईन फंडा

May 22, 2024 - In Uncategorized

Next Post: बाल न्याय कायद्याचा अभ्यास नसलेल्या वृत्तवाहिन्या मिडीया ट्रायल करतात

May 22, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.