अर्धापूर पोलीसांनी परिवहन विभागासोबत ओव्हरलोड हायवा पकडल्या; 2 लाखांपेक्षा जास्त दंड


नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी एका भरधाव हायवाने अपघात करून एका दुचाकी स्वाराच्या मृत्यूचे कारण झाल्यानंतर अर्धापूरचे पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या टिमने दोन ओव्हरलोड असलेल्या हायवा पकडून त्यांच्यावर कार्यवाही केली आहे. ही कार्यवाही अर्धापूर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी केली आहे. ओव्हरलोड वाहनांकडून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसुल करण्यात आला आहे.
26 एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर तसेच नागरीकांकडून येणाऱ्या तक्रारी आणि पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारी यांच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपविभाग नांदेड ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक जॉनबेनीयन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम त्यांचे सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी दोन ओव्हरलोड असलेल्या हायवा गाड्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या सोबत संयुक्त कार्यवाहीत पकडल्या आहेत. या गाड्यांकडून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसुल करण्यात आला आहे.


Share this article:
Previous Post: ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी वंचितचे सोमवारी धरणे आंदोलन

May 9, 2024 - In Uncategorized

Next Post: स्थानिक गुन्हा शाखेत सहाय्यक पोलीस निरिक्षक शेकडे, पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे आणि पुयड; कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के

May 9, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.