अर्धापूर-नांदेड महामार्गावर अपघात; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Read Time:1 Minute, 46 Second

अर्धापूर : अर्धापूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर टेंम्पो आणि मोटार सायकलची धडक होवून मोटारसायकल वरील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ जून शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताचे सुमारास शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालयासमोर घडली.

अर्धापूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरुन मोटारसायकल क्रं. एम. एच. – २६ – बी. एल. – १६९० ने संभाजी तुकाराम कवडे (वय ६० वर्षे ) रा. पार्डी (म.) ता. अर्धापुर हे अर्धापूर कडून पार्डीकडे जात होते. शंकरराव चव्हाण महाविद्यालयासमोर एक टेम्पो ( छोटा हत्ती ) क्रं. एम. एच. – २६ – बी. ई. – ३०१२ ने अचानक समोर येऊन मोटार सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार संभाजी कवडे गंभीर जखमी झाले होते.

या घटनेची माहीती मिळताच वसमत फाटा महामार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटना स्थळी धाव घेवून जमादार रमाकांत शिंदे, पो. कर्मचारी महेश काञे, सेवक वसंत सिनगारे यांनी जखमीला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील डाक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी रितसर कार्यवाही अर्धापूर पोलीस करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − eight =