अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली, म्हणाली तो मर्द…

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 33 Second


मुंबई | अभिनेत्री मलायका आरोरानं(Malaika Arora) अरबाज खानसोबत(Arbaj Khan) 2017 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या मलायका तिच्यापेक्षा वयानं लहान असलेला अभिनेता अर्जुन कपूरसोबत(Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन तिच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळं अनेकजण तिला ट्रोल करत असतात. नुकतंच ट्रोल करणाऱ्यांना मलायकानं उत्तर दिलं आहे.

Advertisements

मलायका तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळं नेहमीच चर्चेत येत असते. या शोचा चौथा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये मलायकानं ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे. त्यामुळं हा शो चांगलाच चर्चेत आला आहे.

शोदरम्यान स्टॅण्ड अप काॅमेडी करताना मलायका म्हणाली, माझं दुर्भाग्य की, माझं वय जास्त आहे. मी वयानं लहान असलेल्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे म्हणजे माझ्यात हिंमत आहे. मी त्याच्या आयुष्याची वाट लावत आहे, हो ना? असंही ते मजेत म्हणाली.

तो शाळेत जायचा आणि मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यामुळं त्याचं अभ्यासात लक्ष लागत नाही, असं काय आहे का? माझ्यासोबत चल असं मी त्याला म्हणाले नाही. आम्ही डेटवर गेलो तर त्याचा क्लास बुडतो असंही काही नाही, असे टोमणे मलायकान ट्रोल करणाऱ्यांना मारले.

गेम खेळताना तो मला रस्त्यावर भेटलेला नाही. तो एक समज असलेला व्यक्ती आहे. तो मर्द आहे असंही मलायका म्हणाली. मलायाकाने दिलेल्या उत्तरावरून लक्षात येतं की, तिला सांगायचं आहे की अर्जन कपूर जरी तिच्यापेक्षा वयानं लहान असला तरी तो एक समज असलेली व्यक्ती आहे.

दरम्यान, मलायकानं या वयातही स्वत:ला एकदम फीट ठेवलं आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 26 मिलियनपेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *