June 29, 2022

अमेरिकेकडून लसीच्या कच्चा मालाला हिरवा कंदील

Read Time:1 Minute, 27 Second

मागील काही दिवसांच्या आडकाठीनंतर अखेर अमेरिकेने भारताला कोरोनाच्या लढयात साथ दिली आहे. भारतीय एनएसए प्रमुख अजित डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसए प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेकडून लसीसाठी लागणा-या कच्चा माल पुरवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील लसीकरणाला वेग मिळणार आहे. विशेष म्हणजे याआधी अमेरिकेने सीरमच्या मागणीनंतरही कोरोना लसीच्या कच्च्या मालाबाबत निर्बंधाची भूमिका घेतली होती.

नव्या निर्णयानुसार अमेरिकेने भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या आरोग्य खात्याचे तज्ज्ञांचे पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत भारतातील कोरोना कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − two =

Close