‘अमृता फडणविसांची संकटात राजकीय शेरोशायरी; सत्तेची लालसा दिसून येते’

Read Time:1 Minute, 34 Second

तौक्ते चक्रीवादळाचे संकट राज्यावर ओढावले आहे. संकटात अमृता फडणवीस यांनी संवेदशीलता दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटातत असे वागणे योग्य नाही, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे चे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

उमेश पाटील यांनी सौ. फडणवीस यांचा वर चांगलेच तोंडसुख घेतले. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल, तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे.

त्यामुळे अस्वस्थतेतून त्या शेरोशायरी करतात. संकटात शेरोशायरी करण योग्य नाही, या शेरोशायरी वरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वागणं माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला शोभत नाही. असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे. उमेश पाटील यांनी एका मराठी वाहिनिशी बोलताना असे वक्तव्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =