अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणतात…

Read Time:2 Minute, 0 Secondमुंबई | केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शहा यांचा मुंबई दौरा पार पडला. काल लालबागच्या राजासह शहांनी भाजप नेत्याच्या घरच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं.

येत्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन हा दौरा चालल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी बोलताना अमित शहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. याला आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.

मुंबईत मंगलमुर्ती अमंगलमुर्ती पाहिले. मंडपातही राजकारण सुरू होतं. सध्या संघर्षाचा काळ आहे. ते शिवसेना  (Shivsena) संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडले आहेत. या उत्सवात गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धि द्यावी, असा टोला ठाकरेंनी लगावला. आमच्याकडे असणारे सगळे शिवसैनिक कडवट आहेत. निष्ठावंत आहेत. निष्ठावंत सैनिक असतील तर मैदान जिंकू शकतो, असंही पुढं ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपद हवं असतं तर मी क्षणभरात सोडलं असतं. ममता बँनर्जीनाही(Mamata Banerjee) मी ओळखतो. मीही त्यांना तिकडं घेऊन गेलो असतो. किमान राजस्थानात तरी घेऊन गेलो असतो. मात्र मी तसं काही केलं नाही, असा टोला  ठाकरेंनी शिंदेना लगावला.

“अमित शहा यांनी काय-काय घोटाळे केले, मर्डर केले मला सगळं माहिती”

BIS SSA Admit Card 2022 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/वैयक्तिक सहाय्यक परीक्षेबद्दल मोठी बातमीLeave a Reply

Your email address will not be published.

five × 5 =