अमिताभ बच्चनला पुन्हा कोरोना

Read Time:2 Minute, 12 Second

मुंबई : अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोना लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे. अमिताभ बच्चन यांनी कोरोना संसर्गाबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. अमिताभ बच्चन यांना यापूर्वी जुलै २०२० मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. आता २ वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्वांनी स्वत:ला क्वारंंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

कौन बनेगा करोडपती १४ हा कार्यक्रम ७ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने कौन बनेगा करोडपती १४ च्या शूटिंगलादेखील ब्रेक लागला आहे. अमिताभ बच्चन यांना पहिल्या लाटेतदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यालादेखील कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या लाटेत अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − ten =