January 21, 2022

अमरावतीत ४ दिवस संचारबंदी

Read Time:3 Minute, 28 Second

अमरावती : त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम समुदायाने पुकारलेल्या बंददरम्यान प्रचंड दगडफेक झाली. त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेक-यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड, जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चांदणी चौकात दोन समुदाय समोरासमोर आल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दरम्यान, तणावाची स्थिती लक्षात घेऊन अमरावतीत चार दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अमरावतीत शुक्रवारी त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते.

या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजपने बंद पुकारला. या बंददरम्यान पुन्हा जाळपोळ, दगडफेकीसह दंगलीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मोर्चेक-यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. तसाच प्रकार आज घडला. मोर्च्यादरम्यान राजकमल ळप्
चौकात आंदोलकांनी धुमाकूळ घातला. येथे कार पेटवली. प्रतिष्ठानची जाळपोळ केली. काही धार्मिक स्थळाचे नुकसानही केले. शहरातील लालखडी परिसर, चांदणी चौक, पठाण चौक भागात सकाळीच बंदला हिंसक वळण लागले. एवढेच नव्हे, तर नमुना गल्ली भागात तलवारी घेतलेले युवक घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे शहरात तणाव वाढला आहे. शहरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पुढील चार दिवस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट बंदीही लागू करण्यात आल्याचे सुटीवर असलेल्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

त्रिपुरात अशी घटनाच घडली
नाही, हे सुनियोजित षडयंत्र
त्रिपुरात मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच घडली नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटते, असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × two =

Close