August 19, 2022

अबब! नोटांचा भलामोठा ढिग जप्त

Read Time:2 Minute, 46 Second

प. बंगालमध्ये ईडीची कारवाई, कोट्यवधींची रोकड
कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ््या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मंत्री पार्थ चटर्जी यांच्यासह काही मंत्री, सरकारी अधिकारी, दलाल आणि खाजगी व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान २० कोटी रुपयांहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने जप्त करण्यात आले. छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

ईडीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगला प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. स्पेशल ड्युटी पी. के. बंदोपाध्याय आणि तत्कालीन मंत्र्यांच्या खाजगी सचिव सुकांता आचार्जी यांचा समावेश आहे. अर्पिता मुखर्जीच्या मालमत्तांवरही छापे टाकले. अर्पिता मुखर्जी मंत्री पार्थ चटर्जी यांची जवळची सहकारी आहे. याशिवाय पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली, पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सौमित्र सरकार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आलोककुमार सरकार, शिक्षकांच्या नोक-या विकणारा एजंट चंदन मंडल ऊर्फ रंजन आदींचाही समावेश आहे.

२० मोबाईल जप्त
या छाप्यादरम्यान अर्पिता मुखर्जीच्या घरातून २० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम स्टाफ सिलेक्शन कमिशन घोटाळ््याशी संबंधित असण्याची शक्यता आहे. ही रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या पथकाने बँक अधिकारी आणि नोट मोजणी यंत्राची मदत घेतली. तसेच त्यांच्याकडून २० मोबाईलही जप्त केले. याबाबतही आता चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + three =

Close