January 25, 2022

अफगाणिस्तान सोडा

Read Time:2 Minute, 31 Second

काबूल : तालिबानींनी १५ ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर ताबा मिळवला आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर अंमल प्रस्थापित झाल्याचे जाहीर केल्यामुळे संपूर्ण जगालाच चिंता आणि भीती वाटू लागली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज केल्यापासून तेथील परिस्थिती आतापर्यंत सामान्य झालेली नाही. तेथील नागरिक अजूनही भीतीच्या वातावरणात जगत आहेत. तर अनेक देश अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्यांच्या नागरिकांबद्दल चिंतीत आहेत.

दरम्यान, सोमवारी आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हॉटेल्सपासून दूर राहण्याचा इशारा अमेरिका आणि ब्रिटनने दिला आहे. यामध्ये विशेषत: प्रसिद्ध सेरेना हॉटेलचा उल्लेख असल्यामुळे त्यामुळे जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा इशारा देण्यामागे काय कारण असेल याचे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सेरेना हॉटेलमध्ये किंवा त्याच्या जवळ असलेल्या अमेरिकन नागरिकांनी या भागातून त्वरीत बाहेर पडावे, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे.

अफगाणिस्तानचा प्रवास टाळा
ब्रिटन स्टेट डिपार्टमेंटने अफगाणिस्तानला प्रवास न करण्याच्या आपल्या सल्ल्याच्या अपडेटमध्ये म्हटले आहे, वाढत्या जोखमीमुळे नागरिकांना विशेषत: काबूलमधील सेरेना हॉटेलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सेरेना हॉटेल हे काबुलचे सर्वात प्रसिद्ध आलिशान हॉटेल आहे, जे आठ आठवड्यांपूर्वी तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वी त्याला परदेशी लोकांची पहिली पसंती होती. हे दोनदा दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × five =

Close