August 19, 2022

अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या १२९ भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झाले.

Read Time:5 Minute, 47 Second

अमरावती:तालिबाननेअफगाणिस्तानवर रविवारी ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. आता अफगाणिस्तानचे उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत:च्या नावाची घोषणा अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून केली. तालिबानमुळे अफगाणिस्तानमध्ये अराजकासारखी स्थिती आहे. अन्य देशांप्रमाणे भारत सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्यांना भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशात आणले. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या १२९ भारतीय प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे भारतात परतले. या विमानात अमरावतीची श्वेता शंके ही हवाई सुंदरी होती. तिने धाडस दाखवून आपलं कर्तव्य बजावत संपूर्ण परिस्थिती हाताळत प्रवाशांना मायदेशी परत आणले आहे.

अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या १२९ भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं एआय- २४४ या विमानाने काबुल विमानतळातून बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करत व त्यांना मार्गदर्शन करीत आपल्या मायदेशी आणले.

एअर इंडियाच्या विमानाचा थरार

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान पाठवण्यात आले होते. मात्र, काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानला उतरण्याची परवानगी दिली जात नव्हती. एकीकडे तालिबानचे सावट, अपहरणाची शक्यता तसेच आकाशात १२ घिरट्या घालून इंधन संपण्याची भीती या सर्व संकटाच्या परिस्थितीत एअर इंडियाचे विमान काही वेळानंतर काबुल विमानतळावर उतरले आणि अफगाणिस्तानातील नागरिक व अधिकाऱ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान भारतात सुखरूप परतले. यावेळी हवाई सुंदरी असलेल्या श्वेता शंकेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धैर्याने आणि प्रवाशांना धीर देत मार्गदर्शन केले. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

“मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी…”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

देशभरातून कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्राच्या श्वेता शंकेच्या कामगिरीचे सध्या देशात कौतुक केले जात आहे. तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय. श्वेता ही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये असलेल्या बाभळी येथील शिवाजी चौकात राहते. अफगाणिस्तानातून भारतीयांना सुखरुप परत आणणारी ‘निरजा’ श्वेता हिच्याशी महाराष्ट्राच्या मंत्री यशोमती ठाकूरांनी संवाद साधला. ताई, बाहेर गोळ्यांचे आवाज येत होता. पण आम्ही मोहिम फत्ते केली, असे श्वेताने यावेळी सांगितले.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, मंगळवारी तालिबानने पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबतही स्पष्टीकरण दिले. यामध्ये महिलांप्रती तालिबानची भूमिका काय असेल, आंतरराष्ट्रीय संघटनांसह त्यांचे संबंध कसे असतील आणि माध्यमांसाठी त्यांचे काय नियम असतील अशा अनेक प्रश्नांवर त्याने तालिबानची भूमिका स्पष्ट केली. यावेळी तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्याला मान्यता द्यावी अशी प्रमुख मागणी केली. याशिवाय अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दूतावासाला नुकसान पोहोचवले जाणार नसल्याचे आश्वासन देत महिलांना आणि माध्यमांना काही सूट देणार असल्याचेही त्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 + 5 =

Close