…अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Read Time:4 Minute, 46 Second

नवी दिल्ली | शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या (pm kisan yojana) 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता फारशी वाट पाहावी लागणार नाही. सरकार (Goverment) या महिन्यात 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकतं. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेलं नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. कारण ई-केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती जी आता संपली आहे.

पीएम किसान योजनेवर (pm kisan yojana) बोलताना प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता म्हणाले की 12 व्या हप्त्याचे 2,000 रुपये फक्त आधार लिंक केलेल्या खात्यात हस्तांतरित केले जातील.

5 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शासनाचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांना मिळणारे लाभ थांबवणं, पैसे वसूल करणं हा आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलै ते 31 ऑगस्ट अशी वाढवण्यात आली होती, या अटीपर्यंत लाभ घेणार्‍या सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायची होती.

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (pm kisan yojana) लाभार्थी असाल आणि तुम्ही ई-केवायसी करू शकत नसाल तर तुमचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. अशात सरकारने अद्याप मुदत वाढवलेली नाही. पुन्हा नवीन तारीख दिल्यास तुम्ही ई-केवायसी करू शकता.

11व्या हप्त्याचे पैसे सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते. मात्र देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. मात्र ते यासाठी पात्र होते आणि त्यांचं नावही लाभार्थ्यांच्या यादीत होतं. अकराव्या हप्त्याचे पैसे खात्यात न येण्याची अनेक कारणे होती. आता ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, त्या शेतकऱ्यांना आता 12 व्या हप्त्यासोबत 11 व्या हप्त्याचे पैसेही मिळणार आहेत. अशाप्रकारे यावेळी सरकार त्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये टाकू शकतं.

दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत सरकार अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात.

प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे 3 समान हप्त्यांमध्ये पाठवतं, म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये देतं.

थोडक्यात बातम्या-

नौदलात दाखल होणार पहिली ‘मेड इन इंडिया’ विमानवाहू युद्धनौका!

राज्यातील ‘या’ भागाला अतिवृष्टीचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचं शेतकऱ्यांसाठी मोठं वक्तव्य!

बीडमध्ये गणपतीच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंसमोर घडला धक्कादायक प्रकार!

रोजगाराच्या शोधात असलेल्या सर्व तरूणांसाठी रोजगाराची मोठी संधी!


Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − 4 =