अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या सहा जणांना अटक – VastavNEWSLive.com


 

अनोळखी मयताची ओळख पटली
नांदेड(प्रतिनिधी)-19 जून रोजी डंकीन, लिंगायत स्मशानभुमीत परिसरात सापडलेल्या अनोळखी माणसाच्या प्रेताचा उलगडा खून म्हणूनच झाला.या प्रकरणात पोलीसांनी आजपर्यंत 6 जणांना अटक केली आहे. आज दि.26 जून रोजी सहाव्या आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी ए.के.मांडवगडे यांनी 3  दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
19 जून रोजी दुपारी 2 वाजता गोदावरी नदीच्या काठावरील डंकीन परिसर, लिंगायत स्मशानभुमी परिसर या निर्मनुष्य भागात एका अनोळखी 30 वर्षीय युवकाचे प्रेत सापडले. प्रेत पाहताच असे सांगता येत होते की, त्याचा खूनच झाला आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात माणसांनी अज्ञात व्यक्तीचा खून केल्याचा गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी सर्वप्रथम 20 जून रोजी पोलीसांनी शेख शाहरुख शेख इकबाल(23) यास अटक केली. त्यास न्यायालयाने 27 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. पुढच्या टप्यात शेख कलीम शेख ताजोद्दीन (23), मोहम्मद आयान मोहम्मद रफिक (20) या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 29 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्यानंतर नईफ अब्दुल गफार नईम अब्दुल गफार (24) आणि अब्दुल मोईन अब्दुल सादिक पटेल (22) या दोघांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. काल दि.25 जून रोजी वजिराबाद पोलीसांनी अब्दुल रजाक अब्दुल सत्तार (31) या सहाव्या गुन्हेगाराला पकडले. आज पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे, मनोज परदेशी, रमेश सुर्यवंशी आणि शरदचंद्र चावरे यांनी अब्दुल रजाक अब्दुल सत्तारला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असतांना न्यायाधीश ए.के.मांडवगिरे यांनी पोलीसांची विनंती मान्य करत अब्दुल रजाक अब्दुल सत्तारला 3 दिवस अर्थात 29 जून 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अनोळखी मयताची ओळख पटली
खून झाला तेंव्हा मरणारा कोण हेच माहित नव्हते आणि पोलीसांसाठी त्याचा शोध लागणे अत्यंत महत्वाचे होते. पोलीसांना त्यातही यश आले असून मरणारा 30 वर्षीय युवक लखन विजय घाडगे रा.सांगली हा आहे. त्याच्या नातलगांनी मयताचे प्रेत ओळखले आहे. मयत हा गाड्यांवर चालकाचे काम करत होता आणि मागील बऱ्याच दिवसापासून घरी आलाच नव्हता आणि त्याच्या दुर्देवाने त्याचा मृत्यू नांदेडमध्ये घडला.

संबंधित बातमी ….


Post Views: 1


Share this article:
Previous Post: पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा

June 26, 2024 - In Uncategorized

Next Post: राज्यभरात 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन पदस्थापना

June 26, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.