अनैतिक संबंध ठेवून महिलेने व्यक्तीच्या मृत्यूनंतर 21 लाख 28 हजार बॅंकेतून गायब केले


नांदेड,(प्रतिनिधी)-एका विवाहित व्यक्तीसोबत अनैतिक संबंध तयार करून दुसऱ्या महिलेने त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बॅंक अकाऊंटमधील 21 लाख 28 हजार 101 रुपये आपली आई आणि भावाच्या मदतीने परस्पर काढून घेवून फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल करतांना भारतीय न्याय संहितेची कलमे उल्लेखीत न करता भारतीय दंड सहितेची कलमे उल्लेखीत केली आहे.
अरविंद निवृत्तीराव जोंधळे (53) यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीसोबत दुसऱ्या एका महिलेने अनैतिक संबंध बनविले आणि त्या आधारे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कायदेशीर पत्नी मी आहे हे माहित असतांना बॅंक खात्यातील 21 लाख 58 हजार 101 रुपये दि.20 जानेवारी 2024 रोजी शिवाजीनगर एसबीआय बॅंकेतून काढून घेतले आहेत.
शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेची कलमे 420, 34 नुसार अनैतिक संबंध राखणारी महिला आणि इतर दोघांविरुध्द अर्थात तिचे आई आणि भावाविरुध्द गुन्हा क्रमांक 226/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्याकडे देण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 1 जुलैपासून लागू झाली आहे. पण अद्याप पोलीसांना ती न्याय संहिता पुर्णपणे जुळली नाही. कारण या गुन्ह्यात लावलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलमाऐवजी भारतीय न्याय संहितेची कलमे 318 आणि 3 लावायला हवी होती.


Share this article:
Previous Post: टिपरच्या धडकेत ऍटोतील तीन जण ठार; तीन जण जखमी – VastavNEWSLive.com

July 8, 2024 - In Uncategorized

Next Post: भुजबळांचे ऐकून भाजप संपवू नका-मनोज जरांगे – VastavNEWSLive.com

July 8, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.