अनुष्काने समोर आणला विराटचा खरा चेहरा

Read Time:1 Minute, 31 Second

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे एक ‘पॉवर कपल’ मानले जाते. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेली ही जोडी नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असतेच. आताही एका नव्या कारणासाठी ही जोडी चर्चेत आली आहे. अनुष्काने एक व्हीडीओ शेअर करत विराट कोहलीचा नवा चेहरा समोर आणला आहे. अनुष्का एका नव्या जाहिरातीसाठी विराट कोहलीची फोटोग्राफर बनली आहे.

याचाच एक व्हीडीओ शेअर करत अनुष्काने विराटसंदर्भात काही गोष्टींचा खुलासा केला आहे. कमर्शियलच्या व्हॉईसओव्हरमध्ये, अनुष्का म्हणते की, लोक नेहमी विराट कोहलीला जमिनीवर पाहतात. मी त्याला रोज पाहते तो यापेक्षा थोडा वेगळा आहे. मला त्याची खरी बाजू माहीत आहे.

एक बाजू जी फक्त मलाच माहीत आहे. दररोज एक नवीन कथा, फक्त माझ्यासाठी. त्यांच्यामध्ये मला उत्कटतेचे आणि शांततेचे एक नवीन संतुलन दिसते. तो मजेदार आहे, काळजी घेणारा आहे, त्याच्यामध्ये उत्कटतेचे अनेक स्तर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =