January 21, 2022

अनिल परब चांगले राजकारणी, परंतू असे तुच्छ राजकारण त्यांनी करु नये! पडळकरांची टीका

Read Time:1 Minute, 55 Second

एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन अद्यापही सुरु आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्यासंख्येने एसटी कर्मचारी जमले आहेत. भाजपचे आ.गोपीचंद पडळकरांनीसुद्धा त्याठिकाणी ठिय्या मांडला आहे. मात्र काही एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजु होणार असल्याच्या बातम्यासुद्धा समोर येत आहेत.

भाजपाचे आ.गोपीचंद पडळकर यांनी यावरुनच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर खोचक टीका केली आहे. टीका करतांना अनिल परबांचे कौतुकसुद्धा गोपीचंद पडळकरांनी केले.

अनिल परब हे चांगले राजकारणी आहेत. मात्र एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेऊन पुन्हा कामावर रुजु होत असल्याच्या बातम्या जाणिवपुर्वक पेरल्या जात आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून असले प्रकार केले जात असून आंदोलनात फुट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल परब यांनी असे तुच्छ राजकारण करु नये असे गोपीचंद पडळकर म्हणालेत.

अनिल परब एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन दाबण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहेत. मात्र याचे विपरीत परिणाम त्यांना भिगावे लागण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांचा संयम सुटला आणि त्यानंतर हिंसाचार झाला वा आत्महत्या झाल्या तर यांस सर्वतोपरी स्वत: परिवहनमंत्री अनिल परब जवाबदार असतील असेसुद्धा गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 4 =

Close