अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचे छापे

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह काटोल येथील व अन्य दहा ठिकाणी सीबीआयच्या पथकांकडून शनिवारी सकाळी चौकशी सुरू करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबीयांसह आत मध्येच असल्याची माहिती आहे. मात्र अधिकृत कोणतीही माहिती आतापर्यंत बाहेर आलेली नाही. सीबीआयची टीम पीपीई कीट घालून तपासणी करीत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापे टाकले आहेत.

मुंबईसह नागपूरमध्येही छापेमारी
सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

vip porn full hard cum old indain sex hot