January 21, 2022

अनिल देशमुखांना पुन्हा कोठडी

Read Time:2 Minute, 15 Second

सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अडचणी वाढणार?

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. तसेच सचिन वाझेलादेखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आल्याचे समोर आले आहे.
या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुटीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मूदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + sixteen =

Close