January 21, 2022

अनिल देशमुखांचा बळी! राजा आणि वजीर कुणि औरच, प्रकाश आंबेडकरांचा पवार कुटुंबियांकडे रोख

Read Time:1 Minute, 59 Second

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ झालीय. नुकतीच त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवरच वंचित बहुजन आघाडीचे अद्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात भाष्य करत शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाना साधला आहे.

“अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय. राजा आणि वजीर मात्र पुढे येत नाहीये” प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ ऊडाली आहे. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा संबंद्ध थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडला आहे.

अनिल देशमुख या प्रकारणात फसल्याचे दिसते आहे. त्यांनी ईतरांना वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. कलेक्शन झालं, पण तो पैसा कुठे गेला. अनिल देशमुखांनी तो पैसा कुणाकडे नेऊन दिला हे सांगावे. माफीचे साक्षिदार म्हणून त्यांना दिलासा मिळु शकतो.

राज्यापालांनीसुद्धा याकडे गांभीर्याने बघावे व विचार कारावा असे आवाहनसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. यादरम्यान त्यांनी फडणवीसांवरसुद्धा टीका केली. नावब मलिकांनी फडणवीसांच्या काळातच जमिन घेतली तेव्हा फडणवीस शांत का होते? आता अंगावर आली म्हणू शेकली अशातला हा प्रकार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 10 =

Close