August 19, 2022

अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद

Read Time:2 Minute, 58 Second

अनाथांच्या कल्याणाकरिता कार्य
करण्याऱ्या विनायक धांडे यांचे कार्य
कौतुकास्पद

अकोला – अकोला जिल्ह्यात अनाथ, निराश्रित निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि आबाल वद्ध यांची सेवा करीत असलेले हसताक्षार कलावंत विनायक काशिराम धांडे यांच्या कार्याची प्रशंसा होताना दिसत आहे.
आश्रय ध्यानं फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक काशिराम धांडे हे हसताक्षार कलावंत असुन त्यांच्या कलेचाहजारो विद्यार्थी व शिक्षकांनाही फायदा झाला आहे.
त्याच बरोबर धांडे अनाथ, निराश्रित निराधार, वृद्ध
दिव्यांग आणि आबालवृद्ध यांची सेवा देखील करीत आहेत. गेल्या अनेक वर्षा त्यांचे हे कार्य उद्दात हेतूने अविरत सुरु आहे. त्यांच्या या कामाची दखल माजी राष्ट्रपती डॉ.ए.पि.जे. अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा घेतली. त्या दरम्यान त्यांच्या सामाजिक कार्याबाबत गौरव ही करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांनी धांडेंना अनाथासाठी कार्य स्तुत्य असून ते अधिक उत्कृष्ट करण्याकरिता फाउंडेशन स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी आश्रय ध्यानं फाउंडेशनची स्थापना केली व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून अनाथांसाठी कार्य करीत आहे.


मागील दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या काळात अनेक गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षनिक नुकसान झाले. विशेषत: अनाथ मुलांचे तेव्हा धांडेंनी स्वतःच्या घराला कुलूप ठोकले व मे २०२० पासून अविरत जिथं अनाथ-तिथं शाळा म्हणुन गावोगावी डोंगरी तसेच अति दुर्गम भागात जाऊन अनाथ बालकांना त्याच बरोबर शैक्षणिक दुष्टया मागासलेल्या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून व त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा वयोगटानुसार शिक्षण देत आहे. याकार्यासाठी
त्यांना दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 + 20 =

Close