June 29, 2022

अद्यापही पंतप्रधान मोदींची कबुली नाही

Read Time:2 Minute, 6 Second

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज वादग्रस्त तीन नवीन कृषी मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवरच्या भूमिकेवर टीका होता. शेतक-यांच्या आंदोलनाचे हे यश आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे. तर केंद्रातील सत्ताधारी भाजपला आपल्याच पक्षाचे नेते सुब्रमण्यन स्वामी घरचा अहेर दिला आहे. स्वामींनी ट्विट करत चीनवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला, हे आतातरी मोदी कबुल करतील का? असा सवाल सुब्रमण्यन स्वामींनी उपस्थित केला आहे.

सुब्रमण्यन स्वामी यांनी यासंदर्भात काही वेळापूर्वीच ट्विट केले आहे. चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केला आहे, हे आतातरी मोदी मान्य करतील का आणि मोदी आणि केंद्र सरकार देशाची एक-एक इंच जमीन चीनच्या तावडीतून सोडवतील का? असा प्रश्न सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. स्वामींच्या या ट्विटमुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली आहे.

चर्चा पुन्हा सुरू करण्यावर भारत-चीनचे एकमत
सीमावाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये गुरुवारी १४ व्या फेरीची बैठक झाली. सीमेच्या पश्चिम सेक्टरमध्ये एलएसीच्या स्थितीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. यापूर्वी १० ऑक्टोबरला दोन्ही देशाच्या वरिष्ठ कमांडर्समध्ये बैठक झाली होती. त्यानंतर काय प्रगती झाली? याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 + 20 =

Close