अतिरेक्यांचे नवे षडयंत्र, २०० लोक निशाण्यावर

Read Time:2 Minute, 55 Second

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा एकदा दहशत पसरविण्याच्या तयारीत आहेत. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरात टार्गेट किलिंगसाठी २०० लोकांची यादी तयार केली आहे, असे गुप्तचर विभागाच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या यादीत गुप्तचर संस्था, माहिती देणारे, केंद्र सरकार आणि लष्कराच्या जवळचे मानले जाणारे माध्यम प्रतिनिधी, खो-याबाहेरील लोक आणि काश्मिरी पंडितांची नावे, त्यांच्या वाहनांच्या नंबरसह समाविष्ट आहेत. त्यामुळे सुरक्षा विभागाला सतर्क करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या मुझफ्पराबादमध्ये दहशतवादी संघटनांची २१ सप्टेंबर रोजी बैठक झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहमद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बदर यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते. सर्व तंजीमांच्या लोकांना एकत्र करून एक नवी दहशतवादी संघटना स्थापन केली जाईल. जी केवळ माहिती देणारे, गुप्तचर यंत्रणेचे लोक, खो-याच्या बाहेरचे लोक आणि आरएसएस आणि भाजपचे लोक टार्गेट असतील, असेही अहवालात म्हटले आहे. येत्या काळात हा तंजीम खो-यातील टार्गेटेड किलिंग्जची जबाबदारी घेईल. यासाठी उरी आणि तंगधर मार्गे सीमेपलिकडून ग्रेनेड आणि पिस्तूल पाठवले जात आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

केंद्राची मोठ्या कारवाईची तयारी
जम्मू-काश्मिरात अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवाद्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून काही दिवसांत ७ नागरिकांचा बळी घेतला. या कारवायामागे पाकिस्तानचा हात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे प्रमुख अजित डोवाल यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे आगामी काळात काश्मिरात अतिरेक्यांविरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − ten =