“अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही”

मुंबई | केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही. शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते बनवणार होते. पण ऐनवेळी धमकी मिळाल्याने शरद पवारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेते बनवलं, असं वक्तव्य अजयकुमार मिश्रा यांनी केलं आहे.
अजयकुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांनी संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं. धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व्यक्तीला ते धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या व्यक्तीवर मी काय टिप्पणी करू, असंही मिश्रा म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करणारी ही लोक आहेत, असा टोलाही अजयकुमार मिश्रा यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या-