January 19, 2022

अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन गेले वाहून

Read Time:2 Minute, 29 Second

हिमायतनगर: तालुक्यात दि १६ ऑक्टोंबर रोजी दुपारी सहा वाजेच्या नंतर अचानक आलेल्या मुसळधार पाऊस व वादळीवा-यामुळे शहरासह परिसरातील शेतक-यांनी शेतातच कापलेले व कापून वाळवत घातलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले. अचानक आलेल्या या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतक-यांना पिक विम्यासह शासनाची मदत मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यंदा अगदी सुरूवातीपासूनच पावसाने तुफान फटकेबाजी केली असून एकाच हंगामात तीन चार वेळेस जोरदार पावसाचे आगमन झाले होते.सुरूवातीस पडलेल्या पावसामुळे मुग उडदाचे पिक वाया गेले असताना शेतकरी सोयाबीन पिकाच्या भरोषावर होता. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा जोरदार पावसाचा सोयाबीनला फटका बसला. दुस-या पावसानंतर काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाचे सोयाबीन कापनीच्या हंगामात पुन्हा आगमन झाल्याने शेतक-यांचे कंबरडेच मोडले होते.

याउपरही काल सुरू असलेल्या नवरात्र उत्सवावर सुद्धा ह्या पावसाने कहर केला आहे आशादायी असलेला शेतकरी आता उरलेसुरले सोयाबीनचे पिक काढणीच्या तयारीत असताना काल अचानक पाच वाजजेच्या सुमारास आलेल्या वादळी वा-यासह पावसाने हाहाकार माजवला आहे.अचानक झालेल्या पाऊस व वा-यामुळे शेतात कापून ठेवलेल्या व खळे करून वाळवत घातलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसावर दिवाळी सारखे मोठे सन असताना पैशा आभावी हे सन कसे साजरे करावे असा प्रश्न शेतक-यांना उपस्थित होत असून शेतक-यांना तत्काळ पिक विमा व शासनाची मदत द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 16 =

Close