August 19, 2022

अग्निपथ योजनेला विरोध वाढला

Read Time:2 Minute, 38 Second

आज पुन्हा भारत बंदची हाक, आंदोलक उतरणार रस्त्यावर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ लष्करी भरती योजनेला बिहार, झारखंड, यूपीसह अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले असून काही संघटनांनी २० जून रोजी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. याची ठिणगी सर्वप्रथम बिहार पडली. त्यानंतर बघता बघता देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले.

यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामध्ये रेल्वे, बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. सोमवारी भारत बंदमुळे अनेक राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव राजेश शर्मा यांनी सांगितले की, काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील सर्व शाळा २० जून रोजी बंद राहतील. त्याचप्रमाणे बिहारमध्येही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. २० जूनपासून उन्हाळ््याच्या सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे. मात्र ज्याप्रकारे हिंसाचार आणि तोडफोडीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनेक गाड्या रद्द
अग्निपथ योजनेला सुरू असलेल्या विरोधामुळे पूर्व रेल्वेने रविवारी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांना जोडणा-या २९ गाड्या रद्द केल्या. बिहारच्या विविध भागात, महाराष्ट्रातील वांद्रे आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे धावणा-या सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दोन गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 4 =

Close