अखेर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार

Read Time:1 Minute, 32 Second

मुंबई : ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे ११ वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतंिसह कोश्यारी यांनी नव्या मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ दिली.

पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, शिंदे सरकारच्या या पहिल्या टप्प्यातीव मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना डावलण्यात आलं आहे.

शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे

शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

भाजपाकडून : गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven + six =