August 19, 2022

अखेर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, दरेकरांच्या वक्तव्यावर दिली ही प्रतिक्रिया

Read Time:1 Minute, 41 Second

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनसुद्धा अधिकृतपने हे जाहीरसुद्धा करण्यात आले होते. मात्र आज अखेर सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे.

यावेळी प्रविण दरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली आहे. सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार ही बातमी समोर येताच, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असल्याचे विधान प्रवीण दरेकरांनी केले होते.

प्रवीण दरेकरांचे हे विधान अत्यंत निंदनीय असून दरेकरांच्या या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे यावेळी पुणेकर म्हणाल्या. तसेच हा कलाक्षेत्रातील सर्व महिलांचा अपमान असल्याचेसुद्धा त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाऊन समाजपयोगी कामे करायची, महिलांबाबतीतले कामे करायची हे माझे स्वप्न होते आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले असल्याचेसुद्धा सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 + 5 =

Close