अखेर काँग्रेसच्या आरोपानंतर नाईक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

Read Time:2 Minute, 29 Second

पणजी : राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सेक्स स्कँडलचा आरोप केल्याच्या काही तासांनंतरच गोव्याचे नगरविकास आणि समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक यांनी बुधवारी संध्याकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, नाईक यांनी मुक्त आणि निष्पक्ष तपासासाठी राजीनामा दिला आहे आणि मी तो स्वीकारला आहे. काँग्रेसने जे काही पुरावे दिले आहेत त्याची चौकशी केली जाईल.

ते म्हणाले की नाईक आपली बाजू मांडतील आणि वैयक्तिक पातळीवर लढतील. सावंत म्हणाले, त्यांच्यावर केलेले आरोप हे वैयक्तिक आहेत आणि त्यावर ते काय करतील हा त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा विषय असेल.

शासकीय स्तरावर जी काही चौकशी करायची आहे ती १०० टक्के केली जाईल, अशी ग्वाही सावंत यांनी यावेळी दिली. नाईक यांच्याकडे यापूर्वी असलेले मंत्रीपद रिक्त राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी नाईक यांच्यावर ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. चोडणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा हा आरोप आहे.

३० नोव्हेंबर रोजी चोडणकर यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एक मंत्री ‘‘सेक्स स्कँडल’’ मध्ये गुंतल्याचा आरोप केला होता आणि त्या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी भाजपा सरकारला १५ दिवसांचा अवधी देऊ असे सांगितले होते. त्यादरम्यान सरकारने त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले नाही तर त्यांची नावे जाहीर करु, असे चोडणकर म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 + 12 =