अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द! हायकोर्टाचा मोठा निर्णय, राज्य सरकार मात्र चिंतेत

Read Time:2 Minute, 30 Second

अकरावी प्रवेशासाठी घेतली जाणाnरी सीईटी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. दहावीच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात यावी व पुढील सहा आठवड्यांत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी असे निर्देश ऊच्च न्यायालयाने दिले आहे.

राज्य सरकारसाठी हा चिंता वाढवणार असल्याचा निर्णय मानला जात आहे. सीईटी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सीईटी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. मात्र ऊच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आता पूर्वीसारखीच प्रवेशपरिक्षा राबवावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला असून त्यांचा गोंधळ होतो आहे. राज्य महामंडळाद्वारे होणार्‍या या सीईटीसाठी ११ लाखांच्या वर अरंज प्राप्त झाले आहेत. दहावीच्या परिक्षेनंतरसुद्धा विद्यार्थ्यांवर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठीची टांगती तलवार कायम होती.

कोरोनामुळे यंदा दहावीची परिक्षा रद्द करावी लागली होती. अंतर्गत मुल्यमापणाच्या आधारे निकाल लावण्यात आला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून सीईटीचा घाट घालण्यात आला होता. अनेकांकडून यांस विरोध झाला होता. मात्र राज्य सरकार आपल्या निर्णयावर कायम होते. आता न्यायालयानेच निर्मनय दिला म्हटल्यावर व स्थगितीसुद्धा अमान्य केल्यामुळे तो मान्य करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 1 =