June 29, 2022

अंबानीसह एकाचा ३०० कोटींची लाच देण्याचा प्रयत्न?

Read Time:2 Minute, 9 Second

नवी दिल्ली : अंबानी आणि संघातील एका उच्चपदस्थ व्यक्तीने जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करत असताना तीनशे कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक दावा केला आहे. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयाचे राज्यपाल आहेत. त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंबानी आणि संघातील एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या संदर्भात दोन फाईल्स मंजूर करण्याच्या बदल्यात हा मोबदला मिळणार होता, असा मलिक यांचा दावा आहे. मात्र आपण कायद्यात न बसणारे कुठलेही काम करणार नाही म्हणत मी दिलेली ऑफर फेटाळून लावली आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांचे नाव घेऊन काही व्यक्ती असे काम करू पाहत होते. त्यानंतर मी पंतप्रधानांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर त्यांनी मला कायद्यानुसार काम करण्याचे सांगितले असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मला त्यांनी कसलाही भ्रष्टाचार खपवून न घेण्याचे सांगितले आहे. मलिक हे राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी केलेल्या दाव्यातील काम हे कोणत्या संदर्भातील होते, या संदर्भातील खुलासा केला नसला तरी अनिल अंबानींच्या कंपनीचे असल्याचा काही माध्यमांनी असा नेम धरला आहे. सत्यपाल मलिक हे आपल्या स्पष्ट आणि बेधडक बोलण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

six − 6 =

Close