अंतिम वर्ष वगळता विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी परीक्षेविना होणार उत्तीर्ण!

Read Time:2 Minute, 45 Second

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तूर्त परीक्षांचा फैसला विद्यापीठांवर सोपविला आहे. विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घ्यायची की नाही, यासंबंधी निर्णय घ्यावा. दरम्यान, अधिकाधिक विद्यापीठांनी अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. या विद्यापीठांनी यूजीसीने गेल्या वर्षी तयार केलेल्या परीक्षेसंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा आधार घेतला आहे.

यूजीसीचे सचिव डॉ. रजनीश जैन यांनी विद्यापीठे स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा आणि शैक्षणिक सत्रासंबंधी स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. देशात विविध ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे परीक्षेसंबंधी अद्याप मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे विद्यापीठ पदवीच्या पहिल्या आणि दुस-या वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन किंवा गतवर्षीची स्थिती लक्षात घेऊन उत्तीर्ण करण्याची तयारी विद्यापीठांनी सुरू केली आहे. त्यामुळे पदवीच्या पहिल्या आणि दुस-या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण केले जाऊ शकते.

अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये?
एकीकडे पदवीच्या पहिल्या आणि दुस-या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करण्याची तयारी विद्यापीठांनी सुरू केली असली, तरी अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात घेण्याची तयारीही सुरू केली आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा आढावा घेऊन घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × two =