January 21, 2022

अंकिता पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Read Time:1 Minute, 10 Second

मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचे लग्न गेल्याच आठवड्यात पार पडले आहे.
अंकिता पाटील यांच्या लग्नानंतर अनेक नेते कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.

पाटील म्हणाल्या, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − sixteen =

Close